Breaking News

कुत्र्याने अंगणात खेळणाऱ्या मुलीचा घेतला चावा


जवारनगर आयुध निर्माणी कारखाना येथील दरबान या पदावर कार्यरत असलेले सुधाकर रामटेके हे आयुध निर्माणी वसाहत टाईप वन क्वाटर नं १०२/ मद्ये राहतात काल सायंकाळच्या सुमारास त्यांची ३ वर्षीय मुलगी सुहानी ही अंगनात खेळत असतांना गावातील पिसाळलेल्या कुत्र्यानी चावा घेतला असुन तिला लगेच स्थानिक रुग्णालयात हलविन्यात आले व तिच्यावर उपचार केले असता सुहानी इला चांगलीच दुखापत असल्याने डाँक्टरांनी तिला नागपुरला हलविन्याचा सल्ला दिला, व त्यानंतर सुहानीला नागपुर येथिल केअर रुग्णालयात हलविन्यात आले असुन सुहानीची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे, तर प्रत्येक गावात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेनदिवस वाढतच चालली असुन त्यावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे नाही तर सुहानी सारखे अजुन काही बालके भाटक्या कुत्र्यांचे शिकार होतील यात तिळ मात्र शंका नाही.