Breaking News

उद्योग क्षेत्रातील माहितीची उपलब्धता, पारदर्शकतेत महाराष्ट्र देशात नंबर १



नवी दिल्ली : केंद्र शासन व जागतिक बँकेने उद्योग क्षेत्रासाठी ठरवून दिलेल्या मानकांच्या आधारावर महाराष्ट्राने बाजी मारली आहे. उद्योग क्षेत्रात माहितीचे सुलभीकरण व पारदर्शकता निर्माण करण्यात राज्याने १०० पैकी १०० गुण अर्जित करून देशात पहिला क्रमांक मिळविला आहे.

येथील प्रवासी भारतीय केंद्रात आज केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या उद्योग धोरण व प्रोत्साहन विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या भारतातील विविध राज्य व केंद्र शासित प्रदेशांच्या कामगिरीवर आधारित क्रमवारी जाहीर करण्यात आली.

उद्योग धोरण व प्रोत्साहन विभागाचे सचिव रमेश अभिषेक यांनी आज ही क्रमवारी जाहीर केली. जागतिक बँकेच्या व्यापार व गुंतवणूक विभागाच्या संचालक कॅरोलीन फ्रेऊंड व उद्योग धोरण व प्रोत्साहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी मंचावर उपस्थित होते.