Breaking News

मेट्रो मार्गाच हडपसरपर्यंत विस्तारीकरण करण्यात येणार - किरण गिट्टे

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकारणाच्या वतिंन बांधण्यात येेेणा-या हिंजवाडी ते शिवाजी नगर मेट्रो मार्गाच हडपसरपर्यंत विस्तारीकरण करण्यात येणार आहे.पीएमपीआरडीचे प्रमुख किरण गिट्टे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हिंजवाडी ते शिवाजी नगर मेट्रो मार्गची निविदा या महिना अखेर निश्चित करण्यात येणार आहे. रिंग रोड साठी 2486 कोटी निधी लागणार असून या संदर्भात उद्या दिल्लीला बैठक होणार असल्याचे गिट्टे म्हणाले. प्रधिकारणाच्या हद्दीतील 842 गावां प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभ घेता येणार आहे. यामध्ये वैयक्तिक घर बांधकामासाठी निधी दिला जाणार आहे.