Breaking News

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 2 जणांना अटक

अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिला एका घरामध्ये डांबून ठेवीत तब्बल एक महिनाभर वारंवार बलात्कार केल्याची घटना पारनेर तालुक्यातील वडगाव अंमली गावात उघडकीस आली आहे.पोलिसांनी या प्रकरणी 2 तरूणांना तातडीने अटक केली असून न्यायालयाने दोघांना 6 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. रोशन पवार व सचिन रोहोकले अशी पोलिसांनी अटक केलेल्या तरूणांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 27 मे रोजी वडगाव अंमली गावात आरोपी रोशन पवार याने पीडित मुलीला फोन करून एका ठिकाणी बोलावून घेतले.त्यानंतर त्याने तिला गावा जवळ असलेल्या एका घरात नेऊन बंदिस्त करून ठेवले.त्यावेळी आरोपीने तिच्याकडील मोबाईल फोन काढून घेतला व पळून गेली अथवा कोणाला काही सांगितले तर ठार मारण्याची धमकी दिली होती.त्यानंतर आरोपी दररोज रात्री मुक्कामासाठी घरात जाऊन पीडित तरूणीवर वारंवार बलात्कार करीत असे. काही दिवसांनंतर आरोपी रोशन याने सचिनला त्या घरात नेले. सचिनने मुलीस वेळोवेळी काही तरी खाण्यास देऊन तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला.रोशन येथे येणार नसेल तर मला येथे रहायचे नाही असे पिडीत मुलगी वारंवार सांगत असूनही सचिनने तिच्यावर बलात्कार केला.शेवटी 26 जून रोजी सचिनने पीडित मुलीस तिच्या आजोबांच्या घराजवळ सोडले.त्यानंतर पिडीत मुलीने या बाबत आपल्या आई-वडिलांना माहिती दिली.नंतर पिडीत मुलीने आपल्या आई-वडिलांसमवेत पारनेर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली.त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तातडीने रोशन पवार व सचिन रोहोकले या दोघांना तातडीने अटक केली.सदर पीडित मुलगी व आरोपी रोशनशी अनेक दिवसापासूनची ओळख होती.आरोपीने तिला एक मोबाईल देखील घेऊन दिला होता.तसेच त्याने तिला लग्न करण्याचे आमिष देखील दाखविले होते,अशी माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे.