Breaking News

नदीत बुडून मृत्यू झालेल्या महिलांच्या कुटुंबीयांस आर्थिक मदत


भामरागड तालुक्यातील हिदूर येथील तीन महिलांचा पामुलगौतम नदीत बुडून मृत्यू झाला असून तहसीलदार के.पी. अंडील यांच्या पुढाकारातून मृतकाच्या कुटुंबियांस तात्काळ प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली . हिदूर येथील चार महिला पामुलगौतम नदीवर कपडे धुण्यासाठी गेले असता अचानक आलेल्या पुरामुळे तीन महिला वाहून गेल्या व एक महिलेचा जीव वाचविण्यास नागरिकांना यश आले आहे . वाहून गेलेल्या महिलांचे मृतदेह आढळले असून सौमी दुर्वा , जानकी तिमा , चंदा गोटा असे मृतक महिलांचे नाव आहे . मृतकाच्या कुटुंबियांना तात्काळ सानुग्रह राशी प्रत्येकी ४ लाखाचे धनादेश तहसीलदार अंडील यांच्या हस्ते देण्यात आले.