व्यंकटेश पतसंस्था आर्थिक अपहार प्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ
सोनई ( प्रतिनिधी ) - सोनई येथील व्यंकटेश ग्रामीण पथसंस्थेतील कर्मचार्यांनी ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या पैशावर डल्ला मारणार्या आरोपींना 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी वाढविण्यात आली आहे, गुन्ह्याचे स्वरूप पाहून आरोपी श्यामसुंदर खामकर, गणेश गोरे,व गणेश तांदळे हे कोट्यवधी रुपयांचे अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे, त्यांची पोलीस क ोठडी 17 एप्रिल पर्यंत होती त्यांना नेवासा न्यायालयासमोर हजर करण्यात आले तेव्हा 23 पर्यंत कोठडी सुनावण्यात आली. तपासी अधिकारी भुसारे यांनी आवश्यक माहिती हाती येण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडीत वाढ मिळणे आवश्यक असल्याने न्यायालयाने 6 दिवसाची वाढीव पोलीस कोठडी सुनावली, त्यामुळे आरोपीचा मुक्काम कायम राहणार आहे. त्यात काही संचालक मंडळ फरार झाले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात आणखी कोण कोण सहभागी आहे याची चौकशी सुरू आहे, आ धिक माहिती तपासी अधिकार्याकडून न देण्याचे कारण तपास कमी अडथळा येईल ,असा त्यांचा कयास असल्याचे दिसून येते, दरम्यान आरोपी श्यामसुंदर खामकर, गणेश गोरे व गणेश तांदळे याना सोमवार पर्यंत( दि.23) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.