Breaking News

कपडा व्यापाऱ्याला अडवून चोरट्यांनी ४० हजार रूपयांची बॅग पळविली

शहरातील कपडा व्यापारी महेशकुमार खानवानी हे रात्री दुकान बंद करून घरी जात असताना भंडारा शहराच्या अर्बन बँकेजवळ चेहऱ्याला कपडा बांधलेल्या युवकाने दुचाकी अडवत हॅडलला लागून असलेली ४० हजार रुपये असलेली बॅग पळविण्याची घटना भंडारा शहरात घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीवी कॅमेरात कैद झाली आहे.परंतु हाकेच्या अंतरावर भंडारा शहर पोलीस स्टेशन असल्याने लूटपाट करणाऱ्यांना पोलिसांच्या धाक नसल्याने पोलिसांच्या कार्यश्रमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. महेशकुमार खानवानी यांचे राधिका रेडीमेड नावाचे कपड्याचे दुकान आहे रात्री नेहमी प्रमाणे दुकान बंद करुन घरी निघाले असता अर्बन बँक जवळ तोंडाला कपडा बांधून उभा असलेल्या आरोपीने खानवानी यांना अडवून त्यांच्यावर वार करून त्यांची ४० हजार रुपये असलेली बॅग हिसकावून घेत बाईक असलेल्या दुसऱ्या आरोपी सोबत पळ काढला. ही संपूर्ण घटना कमलाबेन पटेल नर्सिंग कॉलेजच्या सीसीटीवीमध्ये कैद झाली आहे. खानवानी यांनी लगेच पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदविली पोलिसांनी लगेच शोध घेतला. आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले होते. शहराच्या मध्यमागी लूटमारी ची घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यश्रमतेवर प्रश्न निर्माण झाले आहे.