Breaking News

दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

शाळेतून चार दिवसांसाठी निलंबित केल्याने एका दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. शुभम सुरवाडे (१६) या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. शुभम देहूरोड येथील केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेत होता. शाळेतील त्याचे वर्तन ठीक नसल्याच्या करणाहून त्याला चार दिवसांसाठी निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईक करीत आहेत.