Breaking News

भाविनिमगाव सेवा सोसायटी उपाध्यक्षपदी संजय शेळके


भाविनिमगाव प्रतिनिधी- शेवगाव तालुक्यातील भाविनिमगाव येथील सेवा संस्थेच्या उपाध्यक्षपदी संजय गोविंद शेळके यांची निवड करण्यात आली. सेवा संस्थेची दिड वर्षापूर्वी निवडणूक झाली होती. त्यात विरोधकांच्या तगड्या आव्हानानंतरही सत्ताधारी मंडळाने सर्व जागा जिंकून सत्ता राखली आहे. नंतर संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी संचालकांनी एकमताने विद्यमान अध्यक्ष असलेल्या मिलिंद कुलकर्णी यांचीच अध्यक्षपदावर फेरनिवड केली. मात्र उपाध्यक्ष पदासाठी अनेक संचालकांनी दावा केल्याने उपाध्यक्षपदाच्या उमेदवारावर संचालक मंडळामध्ये एकमत न झाल्याने गेल्या दीड वर्षांपासून उपाध्यक्षपदाची निवड रखडली होती. त्यावर संस्थेला वेळोवेळी एआर ऑफीसने नोटीसा पाठवल्या होत्या. त्यावर अखेर निर्णय घेऊन निवड करण्याचे ठरले. मात्र मतदानास सर्वांचाच विरोध होता. शेवटी इच्छुक दिलीप दादा मरकड व संजय गोविंद शेळके हे दोन उमेदवार रिंगणात राहिले . मात्र गुप्त मतदान घेण्यास पार्टी चालकांनी आडकाठी घातल्याने शेवटी चिठ्ठ्या टाकून उपाध्यक्ष पदाची निवड करण्याचे ठरले . त्यात संजय शेळके हे भाग्यवान ठरले असून त्यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. नुतन पदाधिकारी यांचे सभासद वर्गातुन अभिनंदन होत आहे.