संशयित आढळल्यास संपर्क साधा : वाठोरे
राहाता प्रतिनिधी - गावातील तंटे गावातच मिटवून नागरिकांनी गावात शांतता राखण्यास आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास पुढाकार घ्यावा, पोलिसांना सहकार्य करावे तसेच अनोळखी व्यक्तीस मारहाण करू नये, संशयित व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे यांनी केले. ‘पोलीस स्टेशन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत संपन्न झालेल्या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे बोलत होते.