Breaking News

पिण्याच्या पाण्याच्या दोन जलकुंभांचे भूमिपूजन


कोपरगाव / श.प्रतिनिधी 
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर परिसरात दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत पढेगाव चौकी, तिरुमखे वस्ती या भागात पिण्याच्या पाण्याच्या दोन जलकुंभाचे भूमिपूजन जि. प. सदस्य राजेश परजणे यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले. या जलकुंभांची कामे लवकर पूर्ण करण्यात येवून परिसराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू केला जाईल असे आश्‍वासन परजणे यांनी दिले. पढेगाव चौकी भागातील पाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे दोन लाख खर्च अपेक्षित असून या जलकुंभांमध्ये गणेश बंधार्‍यांमधून पाणी सोडण्यात येणार आहे, असा लाभ त्या परिसरातील ढेपले, देने, काळे, साबळे या वस्त्यांवरील रहिवाशांना होणार आहे. या योजनेच्या जलवाहिनीचे काम देखील झालेल्या असून, लवकरच ही योजना पूर्ण केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संवत्सर ते धोत्रे रस्त्यावरील तिरमखे वस्तीजवळ दुसर्‍या जलकुंभाचे भूमिपूजन उपसरपंच विवेक परजणे यांच्या हस्ते करण्यात आले. या परिसरातील बिरोबा चौक, ससाणे बोळ, लोखंडे वस्ती व परिसरातील वाड्या वस्त्यांना पाण्याचा लाभ होणार आहे. योजनेसाठी सुमारे चार लाख रुपये खर्च अपेक्षित असून हे कामही तातडीने पूर्ण केले जाईल असे जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी या प्रसंगी सांगितले. कार्यक्रमास पं.स.चे उपअभियंता पवार, शाखा अभियंता दिघे, घुले यांच्यासह केशव भाकरे, किरण म्हेत्रे, सूर्यभान परजणे, लक्ष्मण साबळे, खंडू फेफाळे, संभाजी आगवन, चंद्रकांत लोखंडे, ज्ञानदेव कासार, चंद्रकांत साबळे, बाळासाहेब दही, संतोष भोसले, बाबुराव महिंद, दिनेश झेंडे, काका गायकवाड, राजेंद्र तिरमखे, बापू तिरमखे, हबीब तांबोळी, ग्रामविकास अधिकारी अहिरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.