Breaking News

ग्रामीण भागातील तरुण शिक्षण क्षेत्रातील शहरी मक्तेदारी मोडीत काढत आहेत- घुले


ढोरजळगाव /प्रतिनिधी:- आजच्या ग्रामीण भागातील तरुण पिढीने शिक्षण क्षेत्रातील शहरी मक्तेदारी मोडीत काढली असून आपल्या मातीत जन्मलेल्या भुमिपुत्रांनी आज आपल्या गावाचे नाव राज्याच्या नकाशावर पोहचविले आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आ. चंद्रशेखर घुले यांनी केले.
ढोरजळगाव ता. शेवगाव येथे ढोरजळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित माहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने निवड झालेले शरद पवार व गुणवंत विद्याथार्ंचा सत्कार व बदली शिक्षकांचा सत्कार समारंभाप्रसंगी घुले बोलत होते. यावेळी शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय कोळगे , भाऊसाहेब आरगडे, भारत वांढेकर , शाहादेव खोसे, राजेंद्र वाणी , भाऊसाहेब अकोलकर , देविदास सांगळे, विक्रम ऊर्किडे , विक्रम लांडे, सरपंच रागिणी लांडे , उपसरपंच विकास नन्नवरे, बाळासाहेब खोसे आदी उपस्थित होते.
घुले म्हणाले की शेवगाव तालुक्यातील शेतकर्‍यांचा पाटपाणी प्रश्‍न अत्यंत गंभीर बनला असुन आपल्या हक्काचे पाटपाणी या परीसरातील शेतकर्‍यांना विरोधकांच्या उदासीनतेमुळे मिळत नाही. हक्काच्या पाटपाण्यात राजकारण आणले जात आहे. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची अवस्था बिकट होत चालली असुन दिव्यांग व्यक्ती व बांधकाम कारागिरांनाही अनुदान स्वरूपात देण्यात येणारे पैसे दिले जात नाहीत . अजुनही बोंड अळीने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. तालुक्याच्या विकासासाठी आपल्या हक्काच्या माणसाची गरज असुन शेवगांची राजकारण म्हणून रणभुमी करू नका. असे स्पष्ट मत घुले यांनी बोलताना व्यक्त केले.
यावेळी गुणवंत विद्यार्थी , शिक्षक आदींचा घुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधाकर गिर्‍हे , गणेश पाटेकर, रोहन साबळे , शरद बेळगे , सचिन काशिद, नरेंद्र पालवे, राहुल देशमुख ,किरण हंबर, अकाश गाडगे, विशाल अकोलकर, निलेश शेळके आदिनी विशेष परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुधाकर लांडे यांनी केले. सुत्रसंचालन राजेंद्र देशमुख यांनी तर आभार रमेश लांडे यांनी मानले.