Breaking News

वृक्ष लागवड मोहिमेला चळवळ बनवा - उद्धव महाराज


नेवासा - (प्रतिनिधी) - नेवासा तालुक्यातील सुरेगावफाटा ते सुरेगाव या रस्त्यावर सुमारे दीड हजार वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ सदगुरु नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या हस्ते वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षलागवड मोहिमेला चळवळ बनवा असे आवाहन उद्धव महाराज यांनी यावेळी बोलतांना केले.
सुरेगाव रस्त्यावरील सदगुरु नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठानसमोर झालेल्या कार्यक्रमा प्रसंगी अहमदनगर जिल्हा सामाजिक वनीकरण विभागाच्या सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी सहायक उपवन संरक्षक भगीरथ निमसे, सुरेगावचे सरपंच बद्रीनाथ शिंदे, वनक्षेत्रपाल गंगाधर सातपुते, वनरक्षक प्रमोद कदम, वनरक्षक लखन शिंदे, नेवासा येथील वसुंधरा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष भैय्या कावरे, सागर महाराज, महेश गवळी, सुरेगाव येथील युवा कार्यकर्ते विक्रांत शिंदे, शेतकरी लक्ष्मण शिंदे, मोहन शिंदे, ज्ञानेश्‍वर राजळे, विक्रांत शिंदे, चंद्रकांत शिंदे, सिंधुबाई शिंदे, प्रदीप शिंदे, बाबा शेळके यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सामाजिक वनीकरण विभागाचे सहायक उपवन संरक्षक भगीरथ निमसे म्हणाले की राज्याचे वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात या वर्षी तेरा कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने गावोगावी ही मोहीम सुरू केली आहे. यावेळी सुरेगावसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भैय्या कावरे यांनी आभार मानले.