Breaking News

दखल रामदास आठवले यांच्यावरचा दबाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर अनुसूचित जातीच्या अनेक नेत्यांना केंद्रात व राज्यांत मंत्रिपदं मिळाली ; परंतु त्याचा फारसा गवगवा कधीच झाला नाही. रामदास आठवले यांना मंत्रिपद मिळताच भारतीय रिपब्लिकन पक्षला जणू आंबेडकर यांच्यानंतर प्रथमच अनुसूचित जातीच्या नेत्याला मंत्रिपद मिळाल्याचा विजयोत्सव साजरा क रण्यात आला. ते साहजिकच आहे. रामदास आठवले हे मासबेस नेते. कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात ते सहभागी होत असतात. पुरोगामी विचाराशी त्यांची बांधिलकी होती. रामदासभाईचं संघटन चांगलं असलं, तरी त्यांच्यात काही अवगुणही आहेत. त्यापैकी एक म्हणजे सत्ताधार्‍यांकडं कायम काही ना काही मागणं. मागण्यांतही काही वावगं नाही ; परंतु हक्कानं मागणं वेगळं आणि लाचारीनं मागणं वेगळं. जे कबूल केलं, ते दिलं नाही, तर संबंधितांना धडा शिकविण्याची ताकद असायला हवी.

सत्ताधार्‍यांच्या दारात वारंवार भिकेचा कटोरा घेऊन उभं राहणं चांगलं नाही. केवळ सत्तेच्या एका फेकलेल्या तुकड्यांवर समाधान मानायचं असेल, तर बाब अलाहिदा ; परंतु एका मंत्रिपदासाठी वैचारिक नाळ न जुळणार्‍या पक्षाशी युती करून रामदास आठवले यांनी विचाराशी द्रोह केला. आंबेडकरांच्या सन्मानाची भाषा करीत भाजपनं क ायम उच्चवर्णीयाचं हित जोपासलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच काँग्रेसनं आठवले यांना अनेकदा खासदार केलं, त्यांच्या सहकार्‍यांना आमदारकी, मं त्रिपदं दिली. एका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आठवले व त्यांचे कार्यकर्ते दोन्ही काँग्रेसला धडा शिकवायला निघाले ; परंंतु त्याचवेळी दोन्ही काँग्रेसनं काय दिलं, याचा त्यांना विसर पडला. भाजपनं सत्तेतील दहा टक्के वाटा देण्याचं आमिष दाखविलं ; परंतु आठवले यांच्या मंत्रिपदाव्यतिरिक्त भाजपनं काहीही दिलं नाही. आठवले यांना मंत्रिपद देऊन उत्तर प्रदेशासह अन्य राज्यांतील अनुसूचित जातीची मतं भाजपनं खिशात घातली. द्यायची वेळ आली, तेव्हा मात्र हात वर केले.
भाजप व आठवले यांच्या पक्षाचे सूत कधीच जुळलं नाही. कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं नाही. आठवले यांनी भाजपला वारंवार इशारे दिले. त्याला भाजपनं काडीचीही किमंत दिली नाही. कार्यकर्त्यांच्या मनात त्यामुळं खदखद वाढत होती. भाजपशी काडीमोड घेण्याच्या भाषेचं हसू झालं. कार्यकर्त्यांना आता ही बाब कळायला लागली आहे. भाजपची मित्रपक्षानं कोडी केली आहे. अशा वेळी भारतीय रिपब्लीकन पक्षा (आठवले गटा) च्या कार्यकर्त्यांनी भाजपची कोंडी करण्याचं ठरवलं आहे. एक एक मित्रपक्ष सोडून जात असताना आठवले यांचा पक्ष सोडून जाणं भाजपला परवडणारं नाही. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजपची साथ सोडून का ँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी करण्यासाठी आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षातून दबाव वाढत आहे. पक्षातील काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आगामी निवडणुकीबाबत चर्चा केली.या बैठकीत भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांनी एकत्र यावं, असं आवाहन पवार यांनी केल्याचं सांगण्यात आलं. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर रिपाइंची युती होती, त्या वेळी या दोन्ही पक्षांनी पक्षाला काही चांगली वागणूक दिली असं नाही. त्यांना धडा शिकविण्यासाठीच मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेशी युती करण्याचा निर्णय आठवले यांनी घेतला ; परंतु गेल्या चार वर्षांतील भाजपचा अनुभव काही चांगला नाही. सत्तेत दहा टक्के वाटा देण्याचं लेखी आश्‍वासन भाजपनं पाळलं नाही. आठवले यांना केंद्रात राज्यमंत्री पद देण्यात आलं ; परंतु कार्यकर्त्यांना लहानलहान सत्तापदांपासून वंचित ठेवण्यात आलं. त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी आता बंडाच्या रूपात बाहेर पडण्याची शक्यता आहे.
इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारणं, लंडनमधील बाबासाहेबांचं वास्तव्य असलेलं घर विकत घेणं व त्याचं स्मारकात रूपांतर करणं, असं काही भाजप सरकारने निर्णय घेतले ; परंतु मागासवर्गीय समाजाच्या विरोधात अनेक निर्णय या सरकारनं घेतले आहेत. आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत सरकार बोटचेपी भूमिका घेत आहे. कोरेगाव भीमा प्रकरणानंतर आंबेडकरी जनतेत या सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आहे. आगामी निवडणुकीत भाजपबरोबर युती केली, तर समाज बरोबर राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळंच पक्षातील काही कार्यकर्ते दुसरा पर्याय शोधत आहेत. पवार यांची भूमिका कायम धर्मनिरपेक्ष, समतावादी, पुरोगामी राहिली आहे. त्यामुळं आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी काय भिू्मका घ्यावी, याबद्दल चर्चा करण्यासाठी रिपब्लिकन पक्षातील काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पवार यांची शुक्रवारी पुण्यात भेट घेतली. बैठकीला मुंबई, पुणे, नाशिक, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यांतील कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव करायचा असेल, तर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र आले पाहिजे, असं आवाहन पवार यांनी बैठकीत केल्याचं सांगण्यात आलं. त्यादृष्टीनं पुढील पावलं उचलली जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुढील महिन्यात चार ऑगस्टला नाशिक येथे राज्यभरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीत आगामी निवडणुकीबाबत काय भूमिका घ्यायची यावर चर्चा केली जाईल, असं सांगण्यात आलं.