Breaking News

मुळा पाटबंधारे विभागातील पदाधिकार्‍यांचा सेवानिवृत्तीबद्दल गौरव


नेवासा(प्रतिनिधी)- नेवासा येथील मुळा पाटबंधारे विभागातील सहा पदाधिकार्‍यांचा सेवानिवृत्तीबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी नेवासाफाटा येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर येथील मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे हे होते. तर नगर येथील पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, ना. शिवथरे यांचे स्वीयसहायक दत्तात्रय कडू, माजी विभागीय अधिकारी बाप्पासाहेब बोडखे, अशोकराव साळुंके, नेवासा येथील मुळा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी एम. एन. राजगुरू, जिल्हा मराठा पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब घुमरे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी आलेल्या मान्यवरांचे बाबासाहेब कणगरे यांनी स्वागत करून सेवानिवृत्त झालेल्या पदाधिकार्‍यांच्या कार्याचा परिचय प्रास्ताविकातून करुन दिला. यावेळी मुळा पाटबंधारे विभागाचे मोहनराव गायकवाड 37 वर्षे सेवा, धोंडीराम डोईफोडे 36 वर्षे सेवा, चांगदेव शिंदे 36 वर्षे सेवा, सदाशिव शेंडे 34 वर्षेसेवा, रामदास कर्जुले 39 वर्षे सेवा, मुक्ताबाई रमेश काकडे 36 वर्षे सेवा यांचा सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना भावी वाटचालीसाठी आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्या. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कालवा निरीक्षक स्वाती साठे-कासार यांनी केले . तर बाबासाहेब कणगरे यांनी आभार मानले. यावेळी मुळा पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.