Breaking News

पाथर्डी भूमीअभिलेख कार्यालयातील भूमापकप लाचलुचपतच्या जाळ्यात


पाथर्डी (प्रतिनिधी) - पाथर्डी येथील भूमीअभिलेख कार्यालयात भूमापकपदी काम करत असलेला लोकसेवक शशिकांत सुग्रीव केंद्रे (वय 26) पदाचा गैरवापर करून 8000 रुपये लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला असुन त्याच्यावर पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये लाचलचपुत प्रतिबंधक कायदा 1988 चे कलम 7,15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समलेली अधिक माहिती अशी की, शिवनाथ नवनाथ शिरसाठ रा. पिंपळगाव टप्पा यांना आपल्या आई आणि चुलत्याच्या नावे पिंपळगाव टप्पा येथील गट नं. 265 या जमिनीचे केलेल्या मोजणीप्रमाणे नकाशा तयार करून प्रकरण निकाली काढण्याचा कामासाठी कायदेशीर परिश्रमिकाखेरीज अन्य पारितोषण म्हणून 10 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 8 हजार रुपये घेण्यास 28 मे रोजी लोकसेवक शशिकांत केंद्रे हा तयार झाला होता . त्यानंतर अहमदनगर येथील लाचलुचपत विभागाकडे शिवनाथ शिरसाठ यांनी तक्रार केली असता , सदरील पडताळणी पंचनाम्यादरम्यान त्याने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले असुन त्याला लाचलुचपत विभागाने 4 जुलै रोजी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस निरीक्षक दीपक करांडे करत आहेत. या कारवाईमध्ये पोलिस निरीक्षक शाम पवरे व दिपक करांडे, तन्वीर शेख, प्रशांत जाधव, विजय गंगुल, काधा खेमनर आदी सहभागी झाले होते.