Breaking News

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेवगाव तालुक्यासाठी 38 लाख मंजूर- घुले



भाविनिमगाव प्रतिनिधी  
जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेअंतर्गत शेवगाव तालुक्यातील गावासाठी सार्वजनिक विविध विकास कामासाठी 38 लाख रुपयांचा विकास निधी मंजूर केला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री चंद्रशेखर घुले यांनी दिली. जानेवारी 2018 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेल्या या विकास निधीतील रकमेतून शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने जिल्हा परिषद गटातील मौजे ताजनापूर नुतन ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी 9 लाख तर भातकुडगांव जिल्हा परिषद गटातील मौजे बक्तरपूर येथील नुतन ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी 9 लाख रुपये असा 18 लाख रूपये निधी मंजूर झाला असुन तालुक्यातील मौजे कांबी, आव्हाने- बु, भाविनिमगाव, दहिगाव-ने, नरेंद्रनगर या चार ग्रामपंचायतीला प्रत्येकी 4 लाख रुपये निधी स्थानिक स्मशानभूमी शुशोभिकरणासाठी मंजूर केला आहे. या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असुन लवकरच कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामांना सुरवात होणार आहे. शेवगाव तालुक्यातील धरणग्रस्त व इतर गावांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास निधी आणण्यासाठी आपला नेहमीच प्रयत्न राहणार आहे. सार्वजनिक जनसुविधा पुरवण्याकडे आपण जातीने लक्ष देणार असल्याचे उपाध्यक्षा घुले यांनी सांगितले.