Breaking News

शासनाने केला आठवी चा वर्ग बंद तर ग्रामस्थांनी केली शाळाच बंद


बेलपिंपळगाव प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथील शाऴेचा इयत्ता आठवीचा वर्ग या शैक्षणिक वर्षापासून बंद करण्याचा आदेश मुख्याधिकार्‍यांनी दिल्याने आय.एस.ओ. नामांकन प्राप्त या शाळेला गेल्या 3 दिवसापासून ग्रामस्थांनी कुलूप लावले आहे . गावात शिक्षणाच्या ज्ञानगंगाला कुलूप लावण्यात आल्यामुळं गावातील इयत्ता पहिली ते सातवीचे 274 विध्यार्थी व इयत्ता आठवीतील 35 विध्यार्थी हे गावातील श्री हनुमान मंदिर परिसरात बसत आहेत. मुख्याधिकार्‍यांनी असा आदेश दिल्यानंतर गावात विशेष ग्रामसभा बोलावून शाळेला जर आठवीच्या वर्गाला जोपर्यंत पुर्ववत परवानगी देण्यात येणार नाही तो पर्यंत शाळेला कुलूप लावण्याचा निर्णय घेण्यात आला. व शाळेला ग्रामस्थांनी कुलूप लावले. त्यामुळे विध्यार्थ्यांच्या शिक्षणाची हेळसांड होत आहे . शाळेला कुलूप लावल्यामुळं विध्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार हा देखील उघड्यावर तयार करावा लागत असून तो खातांना देखील उघड्यावर बसण्याची वेळ या चिमुकल्या जीवांवर आली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे जास्त हाल होत आहेत.या ठिकाणी आ. मुरकुटे यांनी भेट दिली व आश्‍वासन दिले की लवकरच गावातील या शाळेत आठवीचा वर्ग पुर्ववत सुरु करण्यासाठी प्रयत्न केला जाईल . विस्तार अधिकारी यांनी देखील भेट देऊन माहिती घेतली व यावर लवकरच निर्णय घेतले जाईल असे सांगितले. मात्र जिल्हा परिषद सदस्यांनी या समस्येकडे डोकावून देखील पहिले नाही . यामुळे त्यांच्यावर गावात नाराजीचा सूर आहे .