Breaking News

आबासाहेब काकडे कॉलेजचा बी.फार्मसीचा निकाल जाहीर.


शेवगाव ( प्रतिनिधी ) 
नुकत्याच सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांनी घेतलेल्या अंतिम वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला असुन आबासाहेब काकडे कॉलेजचा ऑफ बी.फार्मसीचा निकाल 96 टक्के लागला. सदर परीक्षेत 76.16 टक्के गुण मिळवून सांगळे किशोर याने विशेष प्राविण्यासह प्रथम क्रमांक तसेच 75.79 टक्के गुण मिळवून चोथे भक्तराज याने विशेष प्राविण्यासह द्वितीय क्रमांक व 75.66 टक्के गुण मिळवून अकोलकर प्रवीण याने विशेष प्राविण्यासह तृतीय क्रमांक मिळवला. या परिक्षेत एकूण 7 विषयांपैकी 5 विषयांचा महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह प्रमुख विद्याधरजी काकडे, जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे, समन्वयक मा. संपतराव दसपुते, संचालक विकास गवळी व प्राचार्य शशिकांत पट्टण यांनी कौतुक केले.