Breaking News

मेस्सीची नक्कल करताना फुटबॉलपटूचा मृत्यू


कोलकाता
कोलकात्याचा १९ वर्षांचा फुटबॉलपटू मेसीची नक्कल करताना मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे . मेस्सीचा शॉट कॉपी करताना छातीवर फुटबॉल इतक्या जोरात आदळला कीत्यातच या मुलाचा जीव गेला. सागर दास असं या खेळाडूच नाव असून तो एका स्थानिक क्लबमधून तो फुटबॉल मॅच खेळत होता. सोबतच्या खेळाडूने पास दिल्यावर सागरनेमेस्सीप्रमाणे गोल करण्याच्या इराद्याने बॉल अंगावर घेतला, पण नेम हुकला आणि बॉल थेट छातीवर येऊन आदळला. येथील दत्ता मेडिकल कॉलेज रुग्णालयात सागरला दाखलकरण्यात आलं, पण तिथे त्याचा मृत्यू झाला.