Breaking News

टी-२०मध्ये विराटचा नवीन विक्रम


मुंबई
इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या टी-२० सामन्यात विराटने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्यामध्ये विराटने केलेल्या ध्वनीमुळे २००० धावांचा टप्पा गाठला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये जलद २००० धावा करणारा विराट कोहली पहिला फलंदाज ठरला आहे. विराटने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ८ धावा केल्या आणि हा विक्रमआपल्या नावे केला.

अवघ्या ५६ सामन्यात विराटने २००० धावा पूर्ण केल्या आहेत. हा विक्रम याआधी न्यूझीलंडच्या ब्रॅन्डन मॅक्क्युलमच्या नावे होता. न्यूझीलंडचा मार्टिन गप्तिल २२७१ धावांसहटी-20मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत आघाडीवर आहे. तर ब्रॅंडन मॅक्क्युलम २१४० धावांसह दुसऱ्या आणि पाकिस्तानचा शोएब मलिक २०३९ धावांसह तिसऱ्या स्थानावरआहे.