Breaking News

प्लास्टिकबंदी संदर्भात व्यापार्यांची बैठक

कोपरगाव शहर प्रतिनिधी : 

शहरातील व्यापारी बांधवांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी त्याचप्रमाणे प्लास्टिक साठा व पुनर्निमिती याबाबत चर्चा व उपाय योजना करण्यासाठी मुख्याधिकारी सरोदे यांनी आज {दि. ३०} नगरपालिकेत शहरातील व्यापारांची बैठक बोलविली होती. 

यावेळी ते म्हणाले, की औषधाचे आवरण, कचरा हाताळणे, रोपवाटिका या सारख्या पुनर्प्रक्रिया करता येणारे आणि प्रदूषण महामंडळाकडून प्रमाणित झालेले प्लास्टिक वापरण्यास परवानगी आहे. दुधाची पिशवी, जी ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीची आहे. तसेच द्रवपदार्थाचे पॅकिंगसारखे प्लास्टिक वापरण्यास योग्य आहे. प्लास्टिकपासून तयार केल्या जात असलेल्या बनवल्या जाणार्या पिशव्या , थर्माकोल, व एकदाच वापरल्या वस्तू उदा. ताट, कप , प्लेट्स आदी. तसचे हॉटेल मध्ये अनापदार्थ पॅकिंग साठी वापरले जाणारे भांडे, व वाटी, स्ट्रॉ , पाऊच, या सारख्या वस्तूंवर बंदी आहे. 

यावेळी अडचणी मांडताना व्यापारी बांधवांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. प्लास्टिक बंदी ही फक्त महाराष्ट्रापुरतीच असल्यामुळे परराज्यातून येणार्या वस्तूंचे काय करायचे, तसेच शाम्पू पाऊच, वेफर्स या सारख्या कंपनीच्या पॅकिंगचे काय करायचे असे अनेक प्रश्न यावेळी विचारण्यात आले. मुख्याधिकारी सरोदे यांनी समर्पक उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले.

दरम्यान, दि. ५ जुलैपर्यंत व्यापारी बांधवांनी आपल्या जवळील प्लास्टिक नगरपालिकेत जमा केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई होणार नाही, असे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष विजय वाजे, नगरसेवक स्वप्नील निखाडे, मोहनलाल झंवर, नारायण अग्रवाल, तुळशीदास खुबानी, अजित लोहाडे आदींसह अनेक छोटेमोठे व्यापारी उपस्थित होते.