Breaking News

‘भैरवनाथ’ आणि ‘लक्ष्मी’ची शंभर टक्के वसूली

कोपरगाव श. प्रतिनिधी 

तालुक्यातील चांदेकसारे येथील भैरवनाथ व लक्ष्मी सहकारी सोसायटीने दि. ३०जूनअखेर जिल्हा सहकारी बॅंकेच्या कर्जाची शंभर टक्के वसूली करण्यात आली, अशी माहिती अध्यक्ष अण्णासाहेब होन आणि लता होन यांनी दिली.

ते म्हणाले, सलग दहा वर्षांपासून या दोन्हीही सोसायटयांनी सभासद हितासाठी काम केले. बिपीन कोल्हे यांचे मार्गदशन आणि ‘संजीवनी’चे संचालक संजय होन यांच्या नेतृत्वाखाली विविध योजना राबविण्यात आल्या. दि. ३० जुनअखेर सर्व कर्ज वसूली करून बॅंक पातळीवर सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला. यासाठी उपाध्यक्ष सुभाष होन, अनिता होन आणि सर्व संचालकांनी सहकार्य केले. ‘संजीवनी’चे संचालक संजय होन म्हणाले, गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी अडचणींत आहेत. शासनाच्या कर्जमाफी योजनेबाबतही शेतकऱ्यांच्या मदतीत त्रुटी होत्या. परंतु सोसायटीकडील तसेच जिल्हा बॅंकेचे सर्व थकबाकी पूर्णपणे भरून शेतकऱ्यांनी संस्थेला सहकार्य दिले आहे, ही विशेष अभिनंदनीय बाब आहे. संस्थेचे सचिव विजय खरात आणि डांगे यांनी आभार मानले.