Breaking News

स्वामींच्या सेवेत राहून सद्गुरूंचे कार्य पुढे नेणार : शांतीगिरी महाराज


राहाता / प्रतिनिधी
संन्यास घेतला त्याच दिवशी आपण पिंडदान केले असल्याने, कोणत्याही धमकीगिरीकडे लक्ष न देता प. पु. सद्गुरू संत जनार्दन स्वामींच्या सेवेत राहून सद्गुरूचे कार्य पुढे नेत राहणार असल्याचे वेरूळ मठाधिपती महामंडलेश्‍वर शांतीगिरी महाराज यांनी सांगितले.
राहाता येथील घोलप मंगल कार्यालयात जय बाबाजी भक्तपरिवाराच्या जिल्ह्यातील तालुकावार सेवक समितीच्या निवड तसेच संतपुजन कार्यक्रमात वेरूळ मठाचे प्रवक्ते विष्णुमहाराज यांनी सांगितले की, यापुर्वीही काही समाजकंटकांनी महाराजांच्या गाडीवर दगडफेक केली होती. नाशिक येथील प.पु. शांतीगिरी महाराजांना आलेल्या धमकीपत्राबाबत रितसर खुलताबाद पोलीसांकडे तक्रार दाखल करून, आरोपींना अटक करून ठोस कारवाई करावी अशी मागणी भक्त परिवाराच्या वतीने केलेली आहे. वेरूळ (खुलताबाद) येथे यंदाच्या दि. 20 जुलै ते 27 जुलै 2018 दरम्यान गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त साजरा होणार्‍या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी संस्कार शिबीर आयोजित करण्यात आले असून, या शिबीरात प्रबोधन व मार्गदर्शन केले जाणार आहे. परंपरेनुसार जमा झालेल्या गुरूदक्षणेतून गोसेवा कार्यासाठी व संत जनार्दनस्वामी महाराजांच्या भव्य चांदीच्या रथाच्या पुर्ततेसाठी उपयोग करण्यात येणार असल्याचे प्रवक्ते विष्णु महाराज यांनी सांगितले. याप्रसंगी नगर व पुणे जिल्ह्यातून जयबाबाजी भक्त परिवाराचा मोठा सदस्य परिवार उपस्थित होता.