Breaking News

तर तुमचे जीवन सुखी होईल : अक्षय सागरजी महाराज


श्रीरामपूर / वार्ताहर 
आचार्य विद्यासागरजी महाराज नेहमी सांगतात स्वत:ला स्वत: मध्ये शोधा. रोज मंदिरात जा देव दर्शन करा, पुजाअर्च करा, जिनवाणी वाचा, स्वाध्याय करा तरच तुमचे जीवन सुखी होईल. तुम्ही मोक्ष मार्गाला लागाल. यासाठी धर्माचे पालन करा असे अक्षय सागरजी महाराज म्हणाले.
येथील पाश्रवनाथ दिंगबर जैन मंदिरात संत आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचे परम शिष्य अक्षय सागरजी महाराज, नेमी सागरजी महाराज, क्षुलकजी समताभुषण महाराज संघाचे आगमन झाले आहे. आज प्रवचानात अक्षय महाराज बोलात होते. यावेळी कोपरगांव येथील सि.डी. ठोळे, रविद्र लोहाडे, कैलास पाटणी, रिखब काले, सुनिल कासलिवाल, शिखर लोहाडे, सुरेश कासलिवाल, व मुबंईचे अजित गांधी यांच्या हस्ते आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या फोटोचे अनावरण करण्यात आले. अनिल पांडे यांनी प्रास्ताविक केले. 
आपल्याला संसारातुन पार करणारा कोणी दुसरा व्यक्ती नसुन आपण स्वतः आहोत. हे आपल्या स्वभावाचे ज्ञान आपल्याला असले पाहिजे. आपण दुसर्‍यांना दोष देऊ शकत नाही. आपल्याला जर दुसर्‍यामुळे त्रास होत असेल ते शक्य नाही. आपल्याला आपल्याच कर्मामुळे त्रास होतो. जस कर्म केले तसे त्याला भोगावे लागते. ससांरात कोणी कोणाला देत नाही. आपला व्यवहार कसा आहे त्यावरच आपला सुख आणि दु:खाला कारण ठरतो. करतो एक आणि भोगतो दुसरा असे होत नाही. ससंरात आपणास सुख पाहिजे असते. प्रत्येक व्यक्ती सुख पाहतो, दु:ख कोणालाही नको असते. सुखाचे उपाय आणि सुखाचे कारण काय आहे असे अक्षयसागर महाराज म्हणाले.