Breaking News

सोलापूर : वाहनचोर टोळी गजाआड

सोलापूर, दि. 02, जुलै - रात्री पार्किंगमध्ये थांबलेल्या टोयाटो, फॉर्च्यूनर गाड्यांचे गॅस कटरच्या साह्याने काच उचकटायचे. स्टेअरिंग लॉकही कटरनेच तोडायचे. की कोड मशिन वापरून गाडीचा कोड मिळाल्यानंतर गाडी चोरायची अशा पद्धतीने चोरी करणारी टोळी पंढरपूर तालुक्यातील होती. स्थानिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने ही टोळी जेरबंद केली आहे. विक्रम नंदकुमार ढाळे (वय 30, रा. गवंडी गल्ली, पंढरपूर), पोपट उर्फ प्रदीप सिद्धाथ कुंभार (वय 37, रा. मोरवंची, मोहोळ), अमोल बाळकृष्ण कौलगे (वय 25, रा. पिराची कुरोली, पंढरपूर), रोहित रामू चौगुले (वय 21, रा. कुंभारगल्ली, पंढरपूर), अजीज उर्फ अज्जू दादापीर मनगुली (वय 21, रा. वाघमारे वस्ती, कासेगाव, पंढरपूर) यांना अटक झाली आहे. विक्रम, पोपट, अमोल या तिघांना काल अटक झाली होती. अन्य दोघांना आज अटक झाली आहे. दोन इनोव्हा, एक फॉर्च्यूनर, एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. लातूर, विजापूर, कोर्टी, पुणे (नारायणपूर) व बारामती येथून काही गाड्या चोरल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी आज पत्रकारांना दिली.