Breaking News

नेवासा येथे तहसिलदारांचे वृक्षारोपन


नेवासा ( शहर प्रतिनिधी )- नेवासा येथे तहसिलदारांनी शासकीय निवासस्थानी वृक्षारोपन केले .
शासनाच्या वतीने नागरिकांना दरवर्षी वृक्ष लागवडीसाठी जनजागृती करण्यात येते. शाळा महाविद्यालये , रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येते. 
नेवासाचे तहसीलदार उमेश पाटील यांनी शासकीय निवासस्थानी मागील वर्षी 11 झाडे लावली आहेत , आणि सर्व जगवली आहेत. यावर्षी त्यांनी परीसरात खड्डे घेऊन वृक्षारोपण केले. यावेळी ना. तहसीलदार नारायण कोरडे, तलाठी मलदोडे, कोतवाल नवनाथ आळकुटे उपस्थित होते.