Breaking News

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची ‘सुयोग’ला भेट



नागपूर  
ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज सुयोग पत्रकार सहनिवासाला भेट देऊन पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली.

ग्रामविकास, महिला व बालविकास विभागाच्या योजना, राजकारण, समाजकारण अशा विविध विषयांवर यावेळी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया, ग्रामीण भागातील अतिक्रमणे नियमित करणे, अस्मिता योजना आदी विविध महत्वाच्या योजना व निर्णय लोककल्याणकारी आणि गतिमान प्रशासनासाठी महत्वपूर्ण असल्याचे श्रीमती मुंडे यांनी यावेळी सांगितले. आपण राजकारणात असलो तरी मूलत: आपला पिंड कलावंताचा आहे. मला चित्रे काढायला आवडतात, असेही त्यांनी सांगितले.


विधिमंडळ व मंत्रालय वार्ताहरसंघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, शिबिरप्रमुख महेश पवार, अभियंता श्री. बारई यांच्यासह अनेक पत्रकार यावेळी उपस्थित होते.