शिक्षण विभागाचा गलथाण कारभार...

राज्यातील शाळांमध्ये सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक दिले जातात. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांच्याकडून या पुस्तकांचे वितरण केले जाते. त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातील शाळेतही पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. यातील इयत्ता सहावीच्या भुगोलाच्या पुस्तकामधील काही पानांवर गुजराती भाषेचा वापर केला असल्याचे तटकरे यांनी सांगितले. तसेच ही पुस्तके अहमदाबादमधील श्‍लोक प्रिंट सिटी येथे छापली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व प्रकारामुळे शिक्षण विभागातील गलथान कारभार समोर येत असल्याचे तटकरे म्हणाले.