Breaking News

गुणवंत विद्यार्थ्यांनी उंच भरारी घ्यावी : काशीद

जामखेड / ता. प्रतिनिधी
आधुनिक युगात गुणवंत विद्यार्थ्यांनी चौफेर उंच भरारी घ्यावी, मात्र आपल्या आई वडीलांना विसरू नये; कारण त्याच्या कष्टामुळे आणि परिश्रमातून तुम्ही घडविलेले असता. पाऊले पुढे टाकत असता मागच्या पावलांची जाण ठेवावी असे महत्वाचे विचार हिंद उपकेसरी बबन काशीद यांनी येथील अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यात अध्यक्षीय भाषणात प्रतिपादन केले.
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक शाखा जामखेड यांच्यावतीने आज सकाळी बॅकेच्या सभागृहात प्राथमिक शिक्षकांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात उपमहाराष्ट्र हिंदकेसरी काशीद बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात, नगरसेवक दिगंबर चव्हाण, अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या संचालिका सिमा क्षीरसागर (निकम), जामखेड तालुका गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, सांळुके नगरसेवक, गुलाब जांभळे, राम निकम, निळकंठ घायतडक, विश्‍वस्त गोकुळ गायकवाड, संतोष राऊत, नारायण लहाने, किसन वराट, मुकुंद सातपुते, विकास बगाडे, राजू कर्डिले, एकनाथ चव्हाण यांचेसह शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये योगीता डिसले, नेहा बगाडे, क्षितिजा सोले, साक्षी चव्हाण, प्राची मडके, आकांक्षा वराट, गीतांजली कोकाटे, शिवाणी लहाने, ॠषीकेश सातपुते, आदित्य मोहळकर, सूयोग कुमटकर, श्‍वेता पांडुळे, शुभम मोहळकर आदी 40 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. लक्ष्मीकांत देशमुख यांनी सूत्रसंचालन तर, हनुमंत निंबाळकर यांनी आभार मानले.