Breaking News

गळनिंब येथे गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा व सेवा गौरव पुरस्कार वितरण


उक्कलगाव प्रतिनिधी - श्रीरामपुर तालुक्यातील गळनिंब येथे स्पंदन युवा फौडेंशन, सिद्धेश्‍वर बहुद्देशिय समिती, इंडिया मेकर्स यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा व सेवा गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. एकनाथ ढोणेे होते.
या कार्यक्रमाला अभिनेञी निकिता कुलकर्णी (झी.युवा वाहिनी), अ‍ॅड. क्रांती बागुल, राहुरी ग्रामिण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. सुधिर क्षिरसागर आदी प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी निकिता कुलकर्णी यांच्या शुभहस्ते गळनिंब, फत्याबाद, कोल्हार, उक्कलगाव येथील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्पंदन युवा फौडेंशन, बहुद्देशिय समिती व इंडिया मेकर्स यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सुधीर क्षिरसागर यांना आरोग्य क्षेञात उल्लेखीय कामगिरी बद्दल ’ सेवा गौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. गळनिंब येथे पहिली महिला वकील म्हणुन प्रिंयका ताराचंद देठे यांचा गौरव करण्यात आला. प्राचार्य खर्डे , प्रा.लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला. निकिता कुलकर्णी, प्रा.ढोणे, अ‍ॅड. क्रांती बागुल, डॉ. सुधिर क्षिरसागर आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुञसंचालन व प्रास्तविक जनार्दन ठुबे यांनी केले. प्रमुख अतिथीचे स्वागत ग्रा.पं. सदस्य व स्पंदन युवा फौडेंशनचे अध्यक्ष सदिंप शेरमाळे यांनी केले. अभिनेञी निकिता कुलकर्णी , अ‍ॅड. क्रांती बागुल, अ‍ॅड. रविद्र हळनोर, इंजि. बागुल, डॉ. क्षिरसागर, आदी मान्यवरांनी प्रवरा नदी काठावरील असलेले सिद्देश्‍वर मदिंराला भेट देऊन आंख्यायिका जाणुन घेतली. व सिद्देश्‍वर देवतांचे दर्शन घेतले. यावेळी गावातील ग्रामस्थ होते. यावेळी सचिव अजित देठे, स्पंदन कॉम्प्युटर एज्युकेशनच्या संचालिका अनिता सदिंप शेरमाळे, आण्णासाहेब शेरमाळे, अध्यक्ष माच्छिद्र खेमनर, इंडिया मेकर्सचे अध्यक्ष सोहम चिंधे, कैलास ऐनोर, संजय शिंदे, इद्रभान चिंधे, सुनिल चिंधे, संजय बाहुले, सदिप कचरे, राजेद्र विश्‍वासे, अकुंश भोसले, माधव तुपे, मनोज तुपे, ग्रंथपाल सुभाष भोसले, उपाध्यक्ष गणेश डोमाळे, प्रकाश डोमाळे, किशोर आहेर, फिरोज आत्तार, राहुल तुपे, बजरंग भागवत, सचिन चिंधे, सदिप कडनोर, सदिप जाटे, सदिप चिंधे, संतोष आहेर, अमोल चिंधे, राधाकृष्ण कोर्‍हाळे, अदिनाथ वडितके, कैलास चिंधे, अजय भोसले, सुनिल शिंदे, डॉ. दत्ता पावसे, अशोक भोसले, कैलास पवार, गोपीनाथ जाटे, ताई वाघ, पार्वताबाई बाचकर, कविता भोसले आदी गुणवंत विद्यार्थी व पालक, ग्रामस्थ विविध क्षेञातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
यावेळी विशेष अतिथी अभिनेञी निकिता कुलकर्णी झी.युवा वाहिनीवर गाजत असलेली मालिका कट्टी - बट्टी, संत भगवान बाबा, चिञपट सगळे करुण भागले, संत महिपती, आदी नाटके, शॉर्ट फिल्म, रा. पा. गाजलेले नामकंन पुरस्कार प्राप्त फिल्म, नाटक त्यांनी अभिनय केले आहे. व त्यांना अभिनय क्षेञात उल्लेखीनय कामगिरी बद्दल त्यांना विशेष परितोषिक रा. पा. बेस्ट अ‍ॅक्टेस्, गोल्ड मेडंल नाटक आदी पुरस्कारांनी सन्मानित तेही करण्यात आललेे आहे. यावेळी विशेष परिचय सोहम चिंधे यांनी करुन दिला. शेवटी मान्यवरांचे आभार अजित देठे यांनी मानले.