Breaking News

डॉ. मेहता विद्यालयात शालेय साहित्य वाटप

कोपरगाव : प्रतिनिधी - येथील डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयात कै. सुभाष नाईक यांच्या स्मरणार्थ शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच आणि ज्येष्ठ महिला समिती यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. प्रारंभी विद्यालयाच्या प्राचार्या एम. एस. सुरवसे, उपप्राचार्य बी. के. गवळी, पर्यवेक्षिका एम. डी. राजेभोसले आदींच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी रजनी गुजराथी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. 

त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी टी. व्ही. आणि मोबाईलचा वापर कमी करून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे. ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे अध्यक्ष छोटू जोबनपूत्रा यांनी मनोगत व्यक्त केले. मंचचे कार्याध्यक्ष विजय बंब तसेच विद्यालयाच्या प्राचार्या सुरवसे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास दत्तात्रय कंगले, विजय बंब, उत्तम शहा, रजनी गुजराथी, विजय ससाणे, सुवालाल भंडारी, प्रभाकर बोरावके, सुधाअप्पा कुलकर्णी, डॉ. जयंत राठी, सुतार, नीता डोंगरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर. आर. शिंदे आणि सांस्कृतिक विभागाने यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे क्रीडाशिक्षक रमेश मोरे केले. प्रविण निळकंठ यांनी आभार मानले.