Breaking News

‘डॉ. मेहता’मध्ये विद्यार्थिनींना वृक्ष वाटप

कोपरगाव : डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींना सूर्यतेज संस्थेच्यावतीने १०० झाडांचे वाटप करण्यात आले. संस्थेचे संस्थापक, स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी यासाठी पुढाकार घेतला. याप्रसंगी प्राचार्या एम. एस. सुरवसे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शक केले. उपप्राचार्य बी. के. गवळी यांनी वेगवेगळ्या औषधी वृक्षांची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वितेसाठी के. पी. राठोड यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विद्यालयाचे क्रीडाशिक्षक रमेश मोरे यांनी केले.