Breaking News

काँग्रेसचा बुलढाण्यात आसूड मोर्चा


बुलडाणा

शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे, संपूर्ण कर्जमाफी व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ३० जून रोजी दुपारी तीन वाजता आसूड मोर्चा काढण्यात आला . अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा काढण्यात आला असून जिल्ह्यातील शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.