Breaking News

पंतप्रधानांनी लढवावी हैदराबादमधून निवडणूक खासदार ओवेसींनी थोपटले दंड



हैदराबाद- खासदार असादुद्दिन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांना थेट आव्हान दिले. दोघांपैकी कोणीही हैदराबादमधून ’एमआयएम’विरोधात निवडणूक लढवावी, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. एका जाहीर सभेत बोलत असताना खासदार ओवेसी यांनी हे आव्हान दिले. यावेळी बोलताना ओवेसी यांनी काँग्रेसलाही डिवचले आहे. भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष एकत्रित आल्यास एमआयएमचा पराभव करू शकत नाही, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. दरम्यान, ओवेसी यांनी केलेल्या आव्हानाला भाजपच्या गोटातून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.