Breaking News

वृक्षारोपणासाठी 25 हजार रोपटी नि:शुल्क देणार


मुंबई : ’’वृक्षवल्ली आम्हा सोयरे’’ असे सांगणा-या आपल्या संस्कृतीने झाडे लावण्याचे आणि त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व नेहमीच अधोरेखित केले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने तर व ृक्षारोपणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या बाबी लक्षात घेऊन आपल्या बृहन्मुंबई महापालिकेने सोसायटींच्या आवारात, शाळा - महाविद्यालये - व्यवसायिक आस्थापना इत्यादी खाजगी परिसरात झाडे लावण्यासाठी जुलै महिन्यात 25 हजार देशी झाडांची रोपटी विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या 25 हजार रोपट्यांव्यतिरिक्त महापालिकेच्या अखत्यारितील जागेत 10 हजार रोपटयांची लागवड करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील पर्यावरणाला पूरक अशा देशी झाडांची लागवड अधिकाधिक संख्येने व्हावी, ती झाडे जगावी - वाढावी, पर्यायाने मुंबईतील पर्यावरणाचे संवर्धन व्हावे; या उद्देशाने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेचे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
महापालिका क्षेत्रातील सोसायटींच्या परिसरात, शाळा - महाविद्यालयांच्या आवारात, मॉल्स - कारखाने - कंपन्यांच्या परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे 1 ते 31 जुलै 2018 या एक महिन्याच्या कालावधी दरम्यान वेगवेगळ्या देशी प्रजातींच्या झाडांची 25 हजार झाडे विनामूल्य देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र, या प्रकारे विनामूल्य रोपटी प्राप्त करताना ती झाडे जगविण्याची हमी संबंधित अर्जदारांना घ्यावी लागणार आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या सर्व 24 विभागांमध्ये (थरीव जषषळलश) प्रत्येकी 1 हजार याप्रमाणे एकूण 24 हजार रोपटयांची व्यवस्था यापूर्वीच करण्यात आली आहे. तर 1 हजार रोपटी ही ’वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान’ अर्थात राणीच्या बागेतील मुख्य ’नर्सरी’ मध्ये आहेत. यानुसार एकूण 25 हजार रोपटी विनामूल्य वितरणासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. याबाबत सुयोग्य समन्वय साधला जावा, यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागाच्या उद्यान अधिका-यांची समन्वय अधिकारी (छेवशश्र जषषळलशी) म्हणून नेमणूक देखील करण्यात आली आहे.
वरीलनुसार मोफत वाटप करण्यासाठीच्या 25 हजार रोपट्यांव्यतिरिक्त 10 हजार रोपटी ही मनपा उद्यान खात्याद्वारे महापालिकेच्या अखत्यारितील परिसरांमध्ये लावण्यात येणार आहेत. खाजगी व महापालिका परिसरात झाडे लावताना मुंबईच्या स्थानिक पर्यावरणाला अनुकूल ठरतील, अशाच प्रकारची झाडे प्राधान्याने लावण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्य पुष्प असणा-या तामण, समुद्रफुल, शेवर, काशिद, कारंज, जंगली बदाम, आवळा, नागकेशर, कमंडलू, बकुळ, अर्जुन, पुत्रंजीव, रोहितक, बहावा (अमलताश), पेल्टोफोरम, कडूलिंब, सीता अशोक, सुरु, पिंपळ यासारख्या झाडांच्या रोपट्यांचा समावेश आहे, अशीही परदेशी यांनी दिली आहे.
1 ते 31 जुलै 2018 दरम्यान ज्यांना आपल्या खाजगी परिसरात वृक्षारोपण करावयाचे असेल, त्यांनी विनामूल्य रोपटी प्राप्त करुन घेण्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयातील (थरीव जषषळलश) उद्यान खात्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे करण्यात आले आहे.