अर्बन बँकेतील गांधीगीरीचे गौडबंगाल ः भाग 17 बँक बंद झाली तरी चालेल, अल्पवयीन आप्त कर्मचार्यांची माहीती देणार्यांना धडा शिकविणार!
अर्बन बँकेच्या मुखियाची नविन दर्पोक्ती
अहमदनगर/विशेष प्रतिनिधी
नगर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप बँकेत अल्पवयीन आप्तांची वर्णी लावून परिवारिक कर्तव्य बजावण्याची नविन चाल सुरू झाल्याचे वृत्त प्रसिध्द करताच बँक प्रशासनात खळबळ उडाली आणि ही गोपनीय माहीती दै. लोकमंथनला पुरवणार्या बँक कर्मचार्यांना धडा शिकविण्याचा विडा प्रशासनाच्या मुखियाने उचलला आहे. बँकेला ताळा लागला तरी चालेल पण गांधीगिरी विरूध्द हेरगीरी करणार्या कर्मचार्यांना धडा शिकविण्याची शपथ या मुखियाने घेतल्याचे समजते. दरम्यान, बँकेला प्रतिष्ठा मिळवून देणार्या महानुभवांच्या रांगेत या खुनशी प्रवृत्तींच्या प्रतिमा बँकेच्या भिंतीवर झळकू लागल्याने सभासदांच्या माना शरमेने झुकू लागल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
नगर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप बँकेच्या कारभारात सुरू असलेल्या परिवारीक गांधीगिरीमुळे बँक प्रगतीपथावर जाण्याऐवजी अधोगतीकडे जात असल्याची मालिका दै. लोकमंथनमध्ये प्रसिध्द होत आहे. या मालिकेतून सन 2008 नंतर बँकेच्या संदर्भातील घटनाक्रम क्रमशः प्रसिध्द केला जात असून यामागची कारणमिमांसाही मांडली जात आहे. यातून अनेक पडद्याआड असलेल्या गंभीर बाबी सभासदांपर्यंत पोहचल्या आहेत.विद्यमान संचालक मंडळाच्या हेकेखोर कारभारामुळे अडगळीत पडलेले बँकेचे मालक असलेले सभासद जागृत झाले आणि या जागरूकतेतून नवनवीन माहीती उघड होत आहे.
या बँकेत कर्मचारी भरती करतांना काही शाखांमध्ये संचालक आणि प्रशासनातील मुखियाने आपल्या अल्पवयीन आप्तांची वर्णी बेकायदेशीर लावली आणि अठरा वर्षाखालील किशोरवयीन, बँकेच्या सेवेत बेकायदेशीर रूजू केले. प्राप्त माहीतीनुसार एका महानगरातील शाखेत या मुखियाचा घरोबा असलेल्या एका कुटूंबातील सतरा वर्ष वय असलेल्या एका तरूणीला बँकेच्या सेवेत रूजू केले. योगायोगाने तिला वर्ष दोन वर्षात दुसरीकडे चांगली संधी मिळाल्यानंतर बँकेत रिक्त झालेल्या त्या जागेवर त्या किशोरवयीन तरूणीच्या भावाला संधी देण्यात आली. विशेष म्हणजे बँकेच्या सेवेत रूजू झालेले हे दोन्ही अल्पवयीन भाऊ-बहीण मुखियाच्या आडनावाशी साधर्म्य सांगणारे असल्याने शाखा व्यवस्थापकासह कर्मचार्यांना निमुटपणे अल्पवयीन कर्मचार्यांविषयी आदरयुक्त भिती बाळगावी लागली. ही बाब लोकमंथनने चव्हाट्यावर आणल्याने ही नविन रूजवात करणार्या प्रशासकीय मुखियाचे पित्त खवळले असून या हेरगीरीचा शोध घेऊन संबंधितांना धडा शिकविण्याचा विडा त्याने उचलला आहे. बँक बंद करावी लागली तरी बेहत्तर, पण गांधीगिरीच्या नजरेत घरभेदी ठरलेल्यांना धडा शिकविण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे. या उदाहरणावरून बँक मल्टीस्टेट झाल्यापासून कुणाचाही धाक न बाळगणार्यांना कुठलीही नैतिकता राहीली नाही, बँक ओलीस ठेवण्यासाठी कुठल्याही पातळीवर जाणार्या या प्रवृत्ती खुनशी बनल्या आहेत. अशा प्रवृत्तींच्या प्रतिमा बँक प्रगती पथावर नेणार्या महानुभवांच्या पंक्तीत भिंतीवर लटकतांना पाहून सभासद शरमेने माना झुकवत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. याविषयी सविस्तर उद्याच्या अंकात...(क्रमशः)
धन्यवाद दैनिक लोकमंथन..
नगर अर्बन बँक ही 108 वर्षाच्या वैभवशाली परंपरेवर व भक्कम स्वनिधीवर उभी असलेली व सभासदांच्या जिव्हाळ्याची बँक आहे. माझ्यासारखे लाखो नागरिकांना या बँकेने झिरोतून उभे केले आहे केवळ एका राजकीय व्यक्ती वाईट मनसुब्यांनी या चांगल्या संस्थेला ग्रहण लागले आहे. या बद्दल ही व्यक्ती मागे एकदा संचालक पदावरून बडतर्फ झाली होती, याच व्यक्तीचे कुटुंबातील सदस्यांचे गैरव्यवहारामुळे संस्थेला आर्थिक दंडाचे बदनामीचे कारवाईला सामोरे जावे लागले, या व्यक्तीसह संस्थेचे ईतर संचालक व निष्पाप अधिकारी वर्गाला फौजदारी गुन्हेला सामोरे जावे लागले आहे. या राजकीय दृष्ट्या वजनदार असलेल्या व्यक्तीचे हुकुमशाहीला लगाम घालणेचे काम दैनिक लोकमंथन करत आहे. आमचे सारखे सर्वसामान्यांचा आवाज हुकुमशाहीने व दडपशाहीने नेहमीच दाबण्याचा प्रयत्न झालेला आहे व भविष्यात पण होणेची शक्यता नाकरता येत नाही. अशा परिस्थितीत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे मदतीची गरज पडते व तेच आपण करत आहात आपणास मनापासून धन्यवाद.
-एक जागरूक सभासद
अहमदनगर