Breaking News

‘आत्मा मालिक’चे विद्यार्थी गुणवत्ता यादीत


कोपरगाव ता. प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आयोजित व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या एन. एम. एम. एस. (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल कोकमठाणचे १५६ विदयार्थी गुणवत्ता यादीत आले.

राज्यात एका शाळेतील सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा मान सलग चौथ्या वर्षी आत्मा मालिकने मिळविला आहे. या विदयार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार आहे. आजपर्यंत आत्मा मालिकच्या ६९३ विदयार्थ्यांनी गुणवत्तायादीमध्ये स्थान मिळविले आहे.

यासंदर्भात प्राचार्य निरंजन डांगे म्हणाले, अभ्यासक्रमाचे योग्य नियोजन, ज्यादा तयारी वर्ग व नियोजनात्मक सराव चाचण्या यांच्या जोडीला विद्यार्थी व शिक्षकांची अपार मेहनत या सर्वांमुळेच हे यश मिळाले. आम्ही ‘शतप्रतिशत’हे मिशन वर्षभर राबविले. त्या अंतर्गत ठेवलेल उद्दिष्ट साकार झाले. आत्मा मालिक हे ‘गुणवत्तापूर्ण उत्कृष्ट गुरुकुल’ म्हणून ओळखले जाते. ही ओळख या निकालाने कायम राहिली. 

यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख सागर अहिरे, रमेश कालेकर, मिना नरवडे पर्यवेक्षक अनिल सोनवणे, बाळासाहेब कराळे, रविंद्र देठे, विषय शिक्षक राहुल जाधव, सचिन डांगे, नयना शेटे, राजेंद्र जाधव, अनिता कोल्हे, कल्याणी शिंदे, नितीन अनाप, मिना जाधव, आशा देठे, बाळकृष्ण दौंड, मिना बेलोटे, प्रशांत खलाटे, संजय कहांडळ, भारती बोळीज, बबन जपे, पुनम भवार, सुभाष कदम यांचे मार्गदर्शन लाभले. 

या यशाबद्दल सर्व विदयार्थ्यांचे आश्रमाचे संत देवानंद महाराज, परमानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठठलराव होन, विश्वस्त वसंतराव आव्हाड, प्रभाकर जमधडे, प्रकाश भट, वसंतराव आव्हाड, प्रभाकर जमधडे, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, व्यवस्थापक हिरामन कोल्हे आदींनी अभिनंदन केले.