Breaking News

‘आत्मा मालिक’च्या सीबीएसईचा निकाल १०० टक्के


कोपरगाव : केंद्रिय माध्यमिक परीक्षा मंडळाने इ. १० वीच्या सीबीएसई बोर्डाची मार्चमध्ये परीक्षा घेतली होती. या परीक्षेत येथील आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलने सलग तिस-या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा राखली.
या परीक्षेत प्रथमेश हासे हा विद्यार्थी ९४ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. शिरिष अंधरे याने ८७ टक्के आणि वैष्णव पाटील ८६ टक्के गुण मिळवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प.पू. आत्मा मालिक माउली व संतगण, अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, उपाध्यक्ष भगवानराव दौंड, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन तसेच विश्वस्त वसंतराव आव्हाड, प्रभाकर जमधडे, माधवराव देशमुख, प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, प्राचार्य कांतीलाल पटेल, नामदेव डांगे, सर्व शिक्षक, पालक यांनी अभिनंदन केले.