Breaking News

धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल


संगमनेर : व्हॉट्स अ‍ॅप समुहात एका धर्मातील नागरिकांच्या भावना दुखाविणारा मजकूर व चित्रे टाकणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात संगमनेर शहर पोलीसांत आज {दि. २ } गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी ताहिर नाजीर पठाण {रा. मदिनानगर, संगमनेर) यांनी फिर्याद दिली. व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर न्यू एटंरप्रणर नावाचा समुह आहे. यात ताहिर नाजीर पठाण हे सदस्य आहेत. 

या समुहात शुक्रवारी {दि. १} रात्री आठ वाजेच्या सुमारास एका धर्मातील नागरिकांच्या भावना दुखाविणारा मजकूर व चित्रे व्हॉट्स अ‍ॅप समुहातील एका व्यक्तीने टाकली. त्यामुळे ताहीर यांच्या फिर्यादीवरून आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी हा मुंबई येथील राहणारा असून त्याच्या शोधार्थ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस पोलीस उपनिरीक्षक पंकज निकम हे पथकासह मुंबईकडे रवाना झाले आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक सी. आर. गावंडे हे करीत आहेत.