Breaking News

संशयित चोरांना ‘धुलाई’ आणि ‘अल्पोपहारही’!


भातकुडगाव फाटा प्रतिनिधी 

सोशल मिडियावर सध्या चोरट्यांच्या अफवांचे फुटले आहे. शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथे आणि शहर टाकळी येथील हायस्कूलजवळ दोन संशयित चोरांना स्थानिक नागरिकांनी पकडले. स्थानिक नागरिकांकडून या दोघांची चांगलीच ‘धुलाई’ करण्यात आली. विशेष म्हणजे पोलिस वेळेवर न आल्याने माणुसकीचा धर्म पाळत या दोघांना अल्पोपहारही देण्यात आला. काही वेळाने या चोरट्यांना खाजगी वाहनाने शेवगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

भातकुडगाव फाटा परिसरात चोरांच्या अफवेमुळे शाळेत जाणाऱ्या मुलांसह पालकांमध्येही भितीचे वातावरण पसरले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच चापडगाव परिसरामध्ये अशाच एका संशयित चोराला पकडण्यात आले होते. त्यानंतर भातकुडगाव फाटा येथे दोन संशयितांना स्थानिक नागरिकांनी पकडून दिले. दरम्यान, भारनियमन लक्षात घेता भागात रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवून नागरिकांना संरक्षण द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांसह सामान्य जनतेमधून केली जात आहे.