Breaking News

‘अवकाळी’च्या नुकसानीची तात्काळ मदत द्या : आ. थोरात


संगमनेर : तालुक्यात काल {दि. १ } मान्सून पूर्व झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे घरांसह झालेल्या पिकांच्या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे आणि सर्व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केली.
तालुक्यात मनोली, कोकणगाव, वडगाव पान, पोखरी हवेली, कोंची, मांची आदी गावांत झालेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, नवनाथ अरगडे, प्रांतधिकारी भागवत डोईफोडे, कृषी अधिकारी कारभारी नवले, नायब तहसीलदार रंधे, प्रभाकर बेंद्रे, डॉ. गंगाधर चव्हाण यांनी गावांत पाहणी केली. यावेळी शेतकर्‍यांनी त्यांच्या समस्या इंद्रजित थोरात यांच्यापुढे मांडल्या. कर्ज काढून उभी केलेली घरे व शेती डोळ्यासमोर वाया गेल्याने अनेकांना रडू कोसळले. याप्रसंगी इंद्रजित थोरात, म्हणाले, की निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय मोठा अडणचीत आला आहे. आपल्या सारख्या दुष्काळी भागात कर्ज घेऊन मोठ्या कष्टाने उभी केलेली शेती अवकाळी पावसाने उद्धवस्त झाली आहे. घरे व पिकांचे यावेळी आलेल्या वादळाने मोठे नुकसान झाले. यात मोठी हानी झाली आहे. आ. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन मदत करत आहे. या सर्व नुकसानीची आ. थोरात यांनी माहिती घेऊन नुकसानग्रस्त सर्व शेतकर्‍यांना दिलासा देतांना सरकारने नुकसानीची तात्काळ मदत करावी, यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या.

यावेळी अभिजित बेंद्रे, बाळासाहेब शिंदे, संदीप क्षीरसागर, संतोष वर्पे, काशिनाथ साबळे, सुदर्शन गोराणी आदींसह प्रत्येक स्थानिक ग्रामस्थ, नागरिक, शेतकरी, युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.