Breaking News

मार्क्स, गांधी, आंबेडकर विचारमंथन संमेलन जुलैमध्ये


सोलापूर, - जवाब दो आंदोलन, विचार जागर मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने 8 जुुलै रोजी मार्क्स, गांधी, आंबेडकर विचारमंथन संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभर चालणार्‍या संमेलनात तुषार गांधी, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. भालचंद्र कानगो आदींची भाषणे होणार आहेत. सोलापुरात होणार्‍या या विचार मंथनात धर्मनिरपेक्षता हे आशयसूत्र ठरविण्यात आले आहे. मार्क्स, गांधी व आंबेडकर यांचे धर्मनिरपेक्षतेबाबत काय विचार आहेत व त्यांच्या विचारांमधील साम्यस्थळे याबाबत 8 जुलै रोजी शिवछत्रपती रंगभवन येथे दिवसभर विचारमंथन होणार आहे. या संमेलनाच्या तयारीसाठी जवाब दो आंदोलनाच्या तीन बैठका झाल्या. त्यात अनेक संस्था, संघटना सहभागी झाल्या आहेत. शहरातील सामाजिक कार्यकर्ते, युवक, विद्यार्थी व जनतेने विचारमंथनात सहभागी व्हावे, असे आवाहन कॉ, रवींद्र मोकाशी यांनी केले आहे.