Breaking News

मेट्रो कारशेडसाठी माण येथील सुमारे 50 एकर जागा


पुणे,  महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. या मेट्रो कारशेडसाठी आवश्यक असलेली माण येथील सुमारे 50 एकर जागा लवकर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या डेपोसाठी आवश्यक असलेल्या जागेचा प्रश्‍न सुटणार आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) स्वरूपातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामाची पूर्वतयारी सुरू केली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग सुमारे 23 किलोमीटरचा आहे. पीएमआरडीएने हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी काढलेल्या आर्थिक नि विदांची मुदत येत्या 18 जूनला संपणार आहे. यासाठी तीन कंपन्यांना पात्र ठरल्या आहेत.