Breaking News

‘अमृतवाहिनी’च्या समर कॅम्पला उदंड प्रतिसाद


संगमनेर : येथील अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील तंत्रनिकेतनमध्ये इयत्ता १० वी आणि १२ वीतील विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास या विषयांतर्गत तीन दिवसीय समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला, अशी माहिती प्राचार्य प्रा. व्ही. बी. धुमाळ यांनी दिली.
ते म्हणाले, संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, विश्‍वस्त आ. डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या विश्‍वस्त शरयु देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने राज्यात लौकिक मिळविला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेत सातत्याने नेहमी विविध उपक्रम राबविले जातात.

दरम्यान, या कॅम्पच्या उदघाटनप्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अमृतवाहिनी तंत्रनिकेतनचे प्राचार्य, प्रा. व्ही. बी. धुमाळ, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशनचे विभाग प्रमुख प्रा. बी. एल. कुलकणी, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचे विभाग प्रमुख प्रा. जी. बी. काळे, मेकॅनिकलचे विभाग प्रमुख, प्रा. इंगोले एम. डब्ल्यु. आयटीचे विभाग प्रमुख प्रा. एन. के. चौधरी, सिव्हील इंजि.चे विभाग प्रमुख प्रा. बी. एम. पदमवार, द्वितीय शिफ्ट मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख प्रा. एस. एम. सुर्वेे, वर्कशॉप सुपरीटेन्डेेंट प्रा. एन. बी. शिंदे, सायन्स विभाग प्रमुख प्रा. जे. के. सातपुते आदी उपस्थित होते.

या तीन दिवसांच्या कॅम्पमध्ये व्यक्तिमत्व विकास, आकलन शक्ती विकास, संभाषण कौशल्य विकास, इंटरव्ह्यू टेक्निक, सायन्स पार्क, पुणे व्हिजिटचा होता. या कॅम्पसाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य, व्ही. बी. धुमाळ यांचे मार्गदर्शन लाभले. कॅम्प यशस्वी होण्यासाठी प्रा. जे. एन. हिरे, प्रा. बी. बी. शिंदे, प्रा. आय. डी. फापाळे आणि समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.