‘अमृतवाहिनी’च्या स्कूलचा १०० टक्के निकाल
संगमनेर: अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था संचलित अमृतवाहिनी इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलने अव्वल निकालांची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी ही सीबीएसई दहावीचा १०० टक्के निकाल लागला आहे, अशी माहिती मुख्याध्यापिका जे. बी. सेठी यांनी दिली.
या परीक्षेत आदित्य भुजबळ याने प्रथम क्रमांक मिळविला. ९६. ४० टक्के गुण मिळवून ओमकार राजाराम कानवडे याने द्वितीय तर सृष्टी विजय गायकवाड हीने ९४. २० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. ६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षण व महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, अॅड. आर. बी. सोनवणे, विश्वस्त शरयू देशमुख, बाळासाहेब गुंजाळ, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्रा. व्ही. बी. धुमाळ, प्राचार्या जे. बी. सेठी यांनी विशेष अभिनंदन करुन विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
