नगर-दौड रस्त्याचे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
केंद्रशासनाच्या विशेष निधीतून नगर-दौंड-बारामती-फलटण-विटा-सांगली व म्हैसाळ मार्गे बेळगांव या रस्त्याच्या पहिल्या 93 कि.मी. चे काम अहमदनगर ते वासुंदेफाटा दरम्यानचे काम शासनाने नेमलेल्या ठेकेदारांमार्फत सुरू आहे. या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत व प्रवासी वहातुकीमध्ये येणार्या अडचणीमुळे होणार्या अपघाताबाबत सतत तक्रारी येत आहेत. तसेच वृत्तपत्रामध्ये वारंवार बातम्या येत आहेत. परंतु ठेकेदार याकडे कानाडोळा करून काम सुरूच आहे.
रस्त्याच्या कामाच्या व रस्त्यासाठी वापरात येणार्या मटेरिअलच्या गुणवत्ता व दर्जाबाबत वृत्तपत्रांमधून व स्थानिक प्रवासी, नागरीक यांच्या तक्रारी होत आहेत. तसेच वहातुकीसाठी ज्या पर्यायी रस्त्याची व्यवस्था केली आहे, त्या पर्यायी रस्त्यावर ‘काम सुरू असल्याने काळजी घेणे, दिशा दर्शविणे इ. माहिती देणारे फलक तसेच अपघात होवू नये म्हणून रिफ्लेक्टर्स, बॅरिकेड्स लावणे गरजेचे असतानाही, बर्याच ठिकाणी अशा प्रकारचे फलक, बॅरिकेड्स लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सतत छोट्यामोठ्या अपघातांना स्थानिक नागरीक, प्रवासी, वहातुकदारांना सामोरे जावे लागत आहे. तसेच पर्यायी रत्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने, रस्त्यावर माती असल्याने व पावसाळा सुरू झाल्यामुळे रस्त्यावर मोठया प्रमाणात चिखल होत आहे. दुचाकी प्रवासी तसेच इतर प्रवासी स्थानिक नागरीकांना असुविधेचा सामना करावा लागत आहेे.
वरील सर्व तक्रारीबाबत ठेकेदार प्रतिनिधी श्री. गुप्ता व एमएसआरडीसी कार्यकारी अभियंता यांना त्वरीत सुधारणा व उपाययोजना करणेबाबतच्या सक्त सूचना दिल्या आहेत. सदर कामाच्या गुणवत्ता व दक्षतेबाबत एमएसआरडीसी ठेकेदार, दक्षता व गुणनियंत्रण समिती या सयुंक्त पथकासह पाहणी व विविध ठिकाणची नमुना चाचणी लवकरच करणार आहे. कामामध्ये गुणवत्ता व दक्षतेबाबत दोष, उणिवा आढळल्यास झालेले काम अंदाजपत्रकातील अटी व शर्ती व गुणवत्तेप्रमाणे होईपर्यंत पुढील काम होवू देणार नाही. तसेच कुठल्याही स्थानिक ठेकेदारास कामाचा ठेका दिला म्हणून, दर्जा व गुणवत्ता याबाबत कसलीही गय केली जाणार नाही. तरी कामाचा दर्जा व गुणवत्ता चांगली ठेवून काम तात्काळ मार्गी लावावे असेही आ. राहूल जगताप यांनी सांगितले.