Breaking News

२१ जून - जागतिक योग-दिवस

२१ जून हा जागतिक योग-दिवस म्हणून सुरू करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक मोठे यश आहे. गेली अनेक दशके अनेक पाश्चा त्य आणि पौर्वात्य देशातील नागरिकांना योगाभ्यासात रुची निर्माण झाली आहे. बिहारचा मुंगेर येथील योगाश्रम, लोणावळ्याचे कैवल्यधाम आणि त्यानंतर गेल्या २०-३० वर्षात देशभर शेकडो योगाभ्यास केंद्रे निर्माण झाली आहेत. भारतातली योगपरंपरा पंधराशे वर्षे जुनी आहे असे मानले जाते. महर्षी पतंजलींच्या महत्त्वपूर्ण योगसूत्रांच्या आधी देखील काही शतके योगविद्याचे विविध प्रवाह भारतवर्षात चालू असणार, त्यातूनच कदाचित यांचे संकलन एका बाजूला पतंजली आणि नंतर दुसर्याव बाजूला नाथ संप्रदायाचा हठयोग निर्माण झाले असावेत. आज जगात ‘योगा’चे अक्षरश: हजारो प्रकार व अनेक पटीत योगाभ्यास केंद्रे आहेत. इंटरनेटवर योगा या शब्दाला लाखो संकेतस्थळे मिळतात.