Breaking News

आंतरराष्ट्रीय कबड्डीत वादाची ठिणगी


मुंबई : कबड्डीला गेल्या काही वर्षापासून चांगले दिवस आले आहेत. असे असले तरीही आंतरराष्ट्रीय कबड्डीत सारे आलबेल चालले आहे असे नाही . फेडरेशनचे खजिनदार अशोक दास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी इंग्लंडमध्ये कबड्डीचा प्रसार केला आणि ते आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनचे (आयकेएफ) महत्त्वाचे सदस्य होते,आपल्याला खजिनदार म्हणून स्वाक्षरी करण्याचा अधिकार नव्हता, फेडरेशनमधील आर्थिक व्यवहारांबद्दलही आपल्याला काही माहिती नव्हती, असा आरोप करत त्यांनी हा राजीनामा सादर केला आहे. आयकेएफनेही हा राजीनामा स्वीकारला आहे. बेंगळुरू येथे काही महिन्यांपूर्वी झालेल्या वर्ल्ड कबड्डी फेडरेशन या नव्याने स्थापन झालेल्या संघटनेच्या बैठकीला दास उपस्थित राहिल्यामुळेदेखील ही ठिणगी पडली आहे.