Breaking News

गोरक्षकांना मारहाण प्रकरणी पाच जणांना अटक


।संगमनेर/प्रतिनिधी।

संगमनेर शहरात मंगळवारी {दि. १९} रोजी झालेल्या गोरक्षक मारहाणप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी कारवाई करत पाच जणांना अटक केली. सुफियान नशीर कुरेशी, मुश्ताक उर्फ लाला रज्जाक कुरेशी, तौफिफ आरीफ कुरेशी, अजमत लतीफ कुरेशी, जफर उमर कुरेशी यांचा यामध्ये समावेश आहे. 

या पाच जणांना शहरातील भारतनगर व मदिनानगर भागातील त्यांच्या राहत्या घरून अटक करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मारहाण झालेल्यापैकी आशुतोष शरद भुजबळ याने आरोपींविरुद्ध फिर्याद दिली होती. त्यानुसार बारा मुख्य आरोपींसह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु या घटनेतील मुख्य आरोपी नगरसेवक अद्याप फरार असल्याचे सांगितले जात आहे. आज दुपारी या पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने दि. २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. 

या कारवाईत पो. नि. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक निकम, पो. ना. पवार, पो. हे. कॉ. खंडीजोड, पो. कॉ. बोडखे, शेरकर, लबडे, आढाव, आरोडे आदींनी सहभाग घेतला.